गौतमाच्या दर्शनाला आले असीत मुनी
तपश्चर्या करता करता हिमालयातून
गौतमाच्या दर्शनाला आले असीत मुनी ।।धृ।।
असीत मुनी होते महा अंतर यामी
जंबू दिपाच केलं निरक्षण सार त्यानी
कळाली त्यांना बुद्ध जन्माची भूमी
म्हणून कपील वास्तूत येन केलं त्यानी
संग त्यांचा पुतण्या निरा तमाला घेवूनी
गौतमाच्या दर्शनाला आले असीत मुनी ।।१।।
नामकरण्याच्या दिनी बोले शुद्धोधनाला
दिव्य पुरूष तुमच्या उद्धरी जन्मा आला
सार जग संबुद्धस बोलतील त्याला
आनंद मणी माझ्या भलताच झाला
विश्वभुषण म्हणतील कुणी म्हणतील विश्वज्ञानी
गौतमाच्या दर्शनाला आले असीत मुनी ।।२।।
सिद्धोधनाचे पाळण्यात बाळ पाहून
गेले मुनी त्यांच्या जवळ आनंदाने धावून
चरणावरती माथा टेकवला लिन होऊन
धन्य झालो म्हणे मी दर्शन घेऊन
राहिली ना आता कोणती शंका मणी
गौतमाच्या दर्शनाला आले असीत मुनी ।।३।।
हिमालयात राहातो मी राजा सिद्धोधना
नेत्र मिटून मी करीत होतो प्रार्थना
त्याचीच झाली भेट पुरी झाली मन कामना
सफल झाली माझी पुरी तप साधना
वंदन करण्या कालेनंदा नामकरनाच्या दिनी
गौतमाच्या दर्शनाला आले असीत मुनी ।।४।।
लेखक कवी गायक भिमराव कालेनंद
Poets & Writer Bhimrao Kelenand Mumbai
0 टिप्पण्या