भीम काळजाचा देठं
दलितांसाठी जाऊन आला कुठं कुठं
भीम होता साऱ्यांच्या काळजाचा देठ ।।धृ ।।
विषमतेच्या विरुद्ध भीम ठाई ठाई चिडला
नवा नवा इतिहास त्याच्यामूळ घडला
आवडलं नाही कधीच त्यांना खोटं
भीम होता साऱ्यांच्या काळजाचा देठं ।।१।।
सात समुद्र सारे पार ते करुनी
दण्या आणली ज्ञानाची शिदोरी भरुनी
लिहणारा घटना देशाची सरळ नीटं
भीम होता साऱ्यांच्या काळजाचा देठं ।।२।।
हक्काचा साऱ्यांना दिला समान वाटा
म्हणून जो-तो मोजी आज लाखानी नोटा
नष्ट केला अज्ञानाचा अंधार कळा कुटं
भीम होता साऱ्यांच्या काळजाचा देठं ।।३।।
खुल्या भावनेचा केला सारा नायनाटं
म्हणून आज पाह्या मिळतो जय भीमाचा थाटं
साक्ष देई दिक्षा भूमी-दादर इंडिया गेटं
भीम होता साऱ्यांच्या काळजाचा देठं ।।४।।
दलितांचे दुःख त्यांनी सारे दूर केले
सनातनी शब्द वार छातीवरती झेले
जाता जाता करून दिली बुद्धाची ती भेटं
भीम होता साऱ्यांच्या काळजाचा देठं ।।४।।
बुद्धिवंता मधी भीम अधिक बुद्धिवंत
ज्ञानवंता मधी भीम अधिक ज्ञानवंत होता
साऱ्या गुणामधी भीम अधिक गुणीवंत होता
साऱ्या शिलामधीं भीम अधिक शिलवंत होता
ज्ञानीवंत म्हणून जगी नाव गाजे मोठं
भीम होता साऱ्यांच्या काळजाचा देठं ।।५।।
स्वतःसाठी नाही त्यांनी काहीच कमविलं
कमावलेलं सारं देशाला अर्पण केलं
शांत करी कालेनंदा भारत जंबू बेटं
भीम होता साऱ्यांच्या काळजाचा देठं ।।५।।
लेखक कवी गायक भिमराव कालेनंद
Poets & Writer Bhimrao Kelenand Mumbai
0 टिप्पण्या