अमर आहे बाबा भिमाच लिखाण | भारतीय संविधान कविता मराठी | संविधान कविता मराठी | Samvidhhan Kavita Marathi

  बोले संविधान 

भारतीय संविधान कविता मराठी | samvidhan kavita


सांगत राहील देशाची ती साऱ्यांना संविधान

अमर आहे बाबा भिमाच लिखाण 

अमर आहे बाबा भीमाच लिखाण ।। धृ ।। 


त्यांनीच मला घडवलं आहे

साऱ्यांची नातं जुडवलं आहे 

बोलत राहील युगान युगे इतिहासाचे पान

अमर आहे बाबा भिमाच लिखाण 

अमर आहे बाबा भिमाच लिखाण ।। १ ।। 


त्यांच्या लिखाणाची ग्वाही देते 

तीच साऱ्यांच्या कामी येते 

लाखो जणांचं खुल्या मनाचं दूर करी आज्ञान   

अमर आहे बाबा भीमाच लिखाण 

अमर आहे बाबा भीमाच लिखाण ।। २ ।। 


चंद्र सूर्य धरती राहील जोवर 

लिखाण भिमाच राहील तोवर 

स्वाभिमानाने साऱ्या जगात मिळेल त्याला सन्मान

अमर आहे बाबा भीमाच लिखाण

अमर आहे बाबा भीमाच लिखाण ।। ३ ।। 


कितीतरी गेले कितीतरी आले 

आंबेडकरावांनी नाही कुणी झाले 

कालेनंदा वाचवणार गांधीचे ते प्राण 

अमर आहे बाबा भिमाच लिखाण

अमर आहे बाबा भीमाच लिखाण ।। ४ ।। 


लेखक कवी गायक भिमराव कालेनंद 

Poets & Writer Bhimrao Kelenand Mumbai 

भारतीय संविधान कविता मराठी | samvidhan kavita




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या