माता रमाई वर सुंदर शायरी | माता रमाई शायरी मराठी | Mata Ramai Shayari Marathi
लेखक कवी गायक भिमराव कालेनंद
Poets & Writer Bhimrao Kelenand Mumbai
दलितांच्या उत्कर्षाची माता रमा ललकार होती
जगातील सन्मानाची भिमाच्या गळ्यातील फुल हार होती
सहनशीलतेची शक्ती शाली खंबीर नार होती
एवढेच नव्हे तर माता रमा भिमाच्या क्रांतीच्या
लढ्याची धार आणि तलवार होती
रमा नसती तर भीम बॅरिस्टर झाले नसते
रमा नसती तर भीम देशी परदेशी गेले नसते
रमा नसती तर भीम दलितांच्या कामी आले नसते
पूर्वी दलितांचे जीवन सनातनाच्या जाळ्यात होतं
दलितांचा अति श्रम त्यांच्या पूरण पोळ्यात होतं
बाबासाहेबांचं अमर पद चवदार तळ्यात होतं
पण देशाला भरून पुरून उरणारे धन कालेनंदा
माता रमाच्या कुंकवाच्या टिळयात होतं
सुख समाधानांनी राहिला नसतो आपण मग्न
टळलं नसतं युगानू युगे दलिता वरच विघ्न
कठीण झालं असतं कालीनंदा सन्मानाने जगणं
जर माता रामाने भीमा संघ केलं नसतं लग्न
बौद्ध धम्म देऊन भिमाने कोटी कोटी लोकांना ज्ञानी केलं
जगात न होणार काम भिमाने दमा दमान केलं
पण ते करण्यासाठी कालीनंदा माता रमानी
आपल्या रक्ताचे पाणी पाणी केलं
झाली नाही कधी रमाची बुद्धिमत्ता भ्रष्ट
दिसून आली जगाला ती स्पष्ट
जीवनभर माता रमाने केलं काबड कष्ट
म्हणून करता आलं कालेनंदा
भिमाला दलितांचे दुःख नष्ट
घेतली परिस्थिती भिमाची उमजून
रमा वागली भीमाला परमेश्वर समजून
गरीबी होती तरी मन खसु दिलं नाही
आणि बाबासाहेबांना ते दिसून दिलं नाही
म्हणून रमाच्या कौतुकाचा साठा मनी साठतो
आणि कालेनंदा परी तिच्या साऱ्यांनाही अभिमान वाटतो
रमामुळे भिमाला घटनेचा साठा लिहिता आला
रामामुळे भीमाला जी जगाचा रीती रिवाज पाहतात आला
रामा मुळे बुद्ध धम्म घेता देता आला
एवढेच नव्हे तर कालेनंदा माता रमामुळे
भीमाला दलितांचा उद्धार करता आला
रमा बोले आपला समाज साहेब आहे कोटी कोटी
त्यांना डांबून ठेवणारी आहे गुलामी मोठी
तुमचा जन्म आहे त्यांच्या उद्धारासाठी
साहेब तुम्ही खूप शिका ही तुमची ही पत्नी रमा
रात दिन आहे तुमच्या पाठी
बाबासाहेबांच्या आईचं नाव होतं भीमा
त्यांच्या पत्नीचे नाव होतं रमा
त्यांनी आयुष्यभर माणुसकी ची दौलत केली जमा
आणि आपल्याही घरी आहेतकालेनंदा आपल्या लाडक्या रमा
.रसाळ गोड मधुर वाणी रमाच्या सन्मुखी होती
माता रमाई भिमाच्या पेनाची टोक होती
माता रमाची नीतिमता नेक होती
अशी ती माता रमाई कालीनंदा भिकू धोत्रेची लाडकी लेक होती
क्षणाक्षणाला गरिबीच्या अनुभवाचे दुःख हृदयात साठवलं
म्हणून भीमाला गुलामी नष्ट करण्यासाठी देशो-देशी पाठवलं
एवढेच नव्हे तर माता रमानी कालेनंदा
माता रमाने पतीच्या सेवेसाठी क्षणा-क्षणाला आपलं रक्त आठवलं
आज जो तो करतोय एकमेकांची टीका
पैशाच्या जोरावरती पैशासाठी तुमची खुशाल विका
मात्र समाजाला देऊ नका धोका
दलितांची मनापासून सेवा करायची असेल तर कालीनंदा
रमा भिमाची शिकवण शिका
रमा बोले तुमची ही रमा साहेब कितीही झिजली तरी चालेल
पण तुमच्या क्रांतीची मशाल विझवू नका
मात्र क्रांति करताना साहेब तुमच्या जीवाला तीळ मात्र सुद्धा झिजवू नका
0 टिप्पण्या