रमाई बना
भिमाई माते सारखं भिमाई बना
त्या भिमाच्या रमा सारखं रमाई बना ।।धृ ।।
भिमाई माते पोटी आला जन्मा लालं
त्यांनीच केलं साऱ्या दलितांना मालामालं
नष्ट केले साऱ्या गुलामाचे ते हालं
तिच्या मूळ गौतम बुद्धाच दर्शन झालं
अशा महामानवाची दाई बना
त्या भिमाच्या रमा सारखं रमाई बना ।। १ ।।
रमानी भिमाला त्या मानीले परमेश्वर
जगात नाव केले पतीच्या आपल्या थोर
सांभाळून साऱ्या संसाराचा आपल्या भार
पतीच्या द्वारे केला दलितांचा तो ऊद्धार
तिच्या परी बघीणीनो सवाई बना
त्या भीमाच्या रमा सारखं रमाई बना ।। २।।
साधी राणी साधी असे साधी बोली
सोन्या मोत्याची आशा कधी नाही केली
काबाड कष्ट करू करू आयुष्यभर गेली
म्हणून तुमचे आमचे सुखाचे दिवस आले
तिच्या आदर्शाची साई बना
त्या भिमाच्या रमा सारखं रमाई बना ।। ३ ।।
तुम्ही काय कमी नाहीत रमा परी वागावं
तसं वागून जगात नाव आपलं गाजावं
माता भगिनींनो कर्तव्याला जागावं
कालेनंदा परी बुद्धा चरणी त्यांच्या लागावं
भिमाई परी विद्वानाची आई बना
त्या भिमाच्या रमा सारखी रमाई मना ।। ४ ।।
लेखक कवी गायक भिमराव कालेनंद
Poets & Writer Bhimrao Kelenand Mumbai
0 टिप्पण्या