कवी वामनदादांचे लिखाण
जिथे तिथे समाजाला देत समाधान
ज्ञानीवंत त्या कवी वामनदादांचे लिखाण ।। धृ ।।
वामनदादांना बाबासाहेबांनी मानलं
हितगुज अंतरी त्यांचे ते जाणलं
म्हणून त्यांचा स्वाभिमानाने करिते सन्मान
ज्ञानीवंत त्या कवी वामनदादांचे लिखाण ।। १ ।।
कवी म्हणून त्यांचं नाव मोठं गाजलं
भलं भलं विद्वानांचं सरकार लाजलं
समाजाचं कलावंतांचं राखीत राही शान
ज्ञानीवंत त्या कवी वामनदादांचे लिखाण ।। २ ।।
त्यांच्या लिखाणाला तोड नाही
तोड नाही आणि ती जोड नाही
म्हणून बोले अमर झाले इतिहासाचे पान
ज्ञानीवंत त्या कवी वामनदादांचे लिखाण ।। ३ ।।
प्रबोधनाचे कार्य मोठे केले
पण समाजाने मात्र त्यांना काही नाही दिले
दूर करीत राहिले सदा प्रत्येकाचं अज्ञान
अमर आहे कवी वामनदादांचे लिखाण ।। ४ ।।
आंबेडकरांच्या विचाराचा धनं
जीवनभर केलं समाजाला दानं
कालेनंदा दावून गेले गौतम बुद्धांचा ज्ञान
अमर आहे कवी वामनदादांचे लिखाण ।। ५ ।।
लेखक कवी गायक भिमराव कालेनंद
Poets & Writer Bhimrao Kelenand Mumbai
वामनदादा कर्डक यांच्यावर सुंदर शायरी
लेखक कवी गायक भिमराव कालेनंद
Poets & Writer Bhimrao Kelenand Mumbai
0 टिप्पण्या