मी, लेखक कवी कालेनंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्धांचे विचार व त्यांची शिकवन मी, माझ्या शेरो शायरीच्या माद्यमातून वाचकांच्या समोर सादर करीत आहे.
जीवनाचा आधार
स्वयंम सत्य ज्याच्या त्याच्या जीवनाचा आधार आहे
नम्रता माणसाचा दागिना असून विनय सद्गुनाचा अलंकार आहे
ज्ञान सामाजिक पाया असून अन्यायाविरुद्ध लढण्याची तलवार आहे
आणि शिक्षण हेच माणसाच्या रक्षणाची ढाल आणि तलवार आहे
माणसाच्या घराला वैभव धनानी येते
माणसाच्या घराला वैभव धनानी येते
माणसाच्या मनाचे परिवर्तन माणसाच्या मनानेच होते
माणसाची परीक्षा माणसाच्या गुणांनी होते
माणसाची किंमत पैशानी होत नाही ती त्याच्या ज्ञानाने होते
शिक्षक वृंद
देशाचं मानव हिताचं परिवर्तन करणारा देशात प्रबंध असावा
माणसाच्या सदगुणांचा फुलापरी दरवळणारा सुगंध असावा
हमेशा कुशल कर्म करताना त्या कुशल कर्मात आनंद असावा
आणि प्रत्येक क्षणात विद्यालयात अंधश्रद्धा विषमता नष्ट करणारा शिक्षक वृंद असावा
ज्ञान हेच धन
मनाला जिंकणारा स्वतःचंच मन आहे
विकासाकडे जाण्याचं प्रत्येकाचं सत्य पण आहे
पण ज्ञान हेच जगातील सर्वात मोठे धन आहे
बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीत
बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीत बहुजनांचे आरक्षण आहे,
बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीत लोकशाहीचे भाषण आहे,
बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीत मानव हिताचे शिक्षण आहे,
एवढेच नव्हे तर कालेनंदा बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीत बहुजनांचे देशाचे भूषण आहे,
बाबासाहेब घटनेच सुवर्ण पान
बाबासाहेब घटनेचा एक एक सुवर्ण पान आहे
त्या पाण्यात त्यांच्या संसाराचं बलिदान आहे
कारण कालेनंदा त्यांनी लिहलेली या देशाची संविधान आहे
म्हणून या देशाची साऱ्या जगात शान आहे
लेखक कवी गायक भिमराव कालेनंद
Poets & Writer Bhimrao Kelenand Mumbai
0 टिप्पण्या