गेली सांगून बुद्धाची वाणी । Geli Sangun Buddhachi Vaani । गौतम बुद्ध गीत । Anand Shinde

 गेली सांगून बुद्धाची वाणी



मंगलमयक्षणी धम्माची गाणी पडावी सर्वांच्या कानी, 

गेली सांगून बुद्धाची वाणी, 

गेली सांगून बुद्धाची वाणी ।। धृ ।।


जन्म ज्याला, मृत्यू त्याला नाही यात शंका

माझे-माझे म्हणून का मानव पिटीत राहतो डंका? 

क्षणभंगुर या जीवनी कशाला अभिमान तो मानी 

गेली सांगून बुद्धाची वाणी, 

गेली सांगून बुद्धाची वाणी ।। १ ।।


पर स्त्री माता, पर स्त्री बहीण, पर धन नाही आपले

तथागतानी निवांत ठाई मनोमनी जप जपले 

स्वतः तरुणी प्रेमाने चारा पशु आणि तो प्राणी, 

गेली सांगून बुद्धाची वाणी, 

गेली सांगून बुद्धाची वाणी  ।। २ ।।


दोन दिवसाची किमया मोठी, घडती गाठी-भेटी

प्रसंग येता बघा शेवटी कोण थांबे कोणासाठी

मानव जन्म एकदाच आहे, नाही कुणाचा कोणी, 

गेली सांगून बुद्धाची वाणी, 

गेली सांगून बुद्धाची वाणी  ।। ३ ।।


दया, क्षमा अन् शांती असावी, नसावं नुस्तं युद्ध

वाचा शुद्ध, काया शुद्ध, नीती असावी शुद्ध 

कालेनंदा अमृत झाले रोहिणी नदीचे पाणी, 

गेली सांगून बुद्धाची वाणी, 

गेली सांगून बुद्धाची वाणी ।। ४ ।।



मंगलमयक्षणी धम्माची गाणी पडावी सर्वांच्या कानी,

गेली सांगून बुद्धाची वाणी,

गेली सांगून बुद्धाची वाणी 


लेखक कवी गायक बी. ए. कालेनंद 


Geli Sanguni Buddhachi Vani song Lyrics 

Song : Geli Sanguni Buddhachi Vani

Singer : Anand Shinde

Lyrics : Poets & Writter B. A. Kalenand Kumbephalkar

Music Lebel : T-Series

Album : Buddhach Abhiyan


    मी, लेखक कवी बी. ए. कालेनंद, गेली सांगून बुद्धाची वाणी या गाजलेले गीताचा लेखक कवी आहे तुम्ही सर्वांनी या गीताला खूप प्रेम दिले त्याबद्दल धन्यवाद मी, माझ्या ब्लॉगच्या माद्यमातून वाचकांच्या समोर माझ्या कविता, शेरो शायरी व माझे गाजलेले गीत सादर करीत आहे.


Music Video 

विडिओ Song  पाहण्यासाठी Watch On Youtube 👇 वर click  करा 👇.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या