डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुंदर कविता | dr. babasaheb ambedkar jayanti 2024 | बाबासाहेब आंबेडकर जयंती फोटो

jay bhim photo, jay bhim shayari

बाबा साहेबांची जयंती 

लय आनंदाने मोठी न घेता विश्रांती 

देती मनाला सुख शांती बाबासाहेबांची जयंती ।।धृ ।।

jay bhim photo,  jay bhim shayari


१८९१ साली  मूर्ती जन्माला आली 

माणसासारखं वागण्याची त्यांनी माणुसकी दिली 

बहुजनांसाठी कधी घेतली ना विश्रांती 

देती मनाला सुख शांती बाबासाहेबांची जयंती ।। १ ।। 


दया क्षमा करूना  पंचशिल  बुद्धांच शिकवी 

भीम बुद्धांच्या चरणी राव रंकाला  झुकवी 

पंचशीला त्या शिलानं सारी  उडवून क्रांती 

देती मनाला शुक शांती बाबासाहेबांची जयंती  ।। २ ।। 


एका आईच्या मुला परी सांगे साऱ्यांना वागा 

अंधश्रद्धा विषमता म्हणे कायमची त्यागा

 साऱ्या गुणात गुन्हा गुणवान लय खूपच गुणवंती 

देती  मनाला सुख शांती बाबासाहेबांची जयंती ।। ३ ।। 


शिका संघटित होऊन बोले संघर्ष करा

माझ्या संदेश हा अनमोल सांगा नारी नरा

 कालेनंदा करणारी मोठी रक्तहीन क्रांती

 देती मनाला सुख शांती बाबासाहेबांचे जय ।।४ ।। 



आंबेडकर बाबासाहेब


अठराशे एक्यानव  साली  माता भिमाई प्रसूत झाली

 रामजी पित्याला लय खुशी आली 14 एप्रिल गौरवशाली

 जन्मले ते युगंधुरंधर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर 


जुन्या युगाचे करून निरीक्षण घेतल भिमाने लय शिक्षण

लिहून देशाची संविधान केलं देशाचं रक्षण

युगपुरुष म्हणती नारी नर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर 


पहिलं दूर करून अज्ञान अंधश्रद्धा विषमतेची घाण 

टाकली बाजूला काढून त्यानं 

दिली माणुसकी साऱ्या दावून

दिमाखाने लय चातुर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर


जगातील साऱ्या विद्वानांनी मानले सर्वश्रेष्ठ ज्ञानी

 ना दिसला कुणी बहुगुणी बाबा आंबेडकरांच्या वाणी 

कालेनंदा बुद्धाच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर

लेखक कवी गायक भिमराव कालेनंद 

Poets & Writer Bhimrao Kelenand Mumbai 


jay bhim,  jay bhim photo

माझा प्रणाम कोटी कोटी 

झिजले दिन रात दिन दुबल्यांच्यासाठी 

त्या रमा भिमाला माझ्या प्रणाम कोटी कोटी ।।धृ ।।


साऱ्या बहुजनांना  देण्या मिळून कमाई 

झाला भीमराव बाप रमा झाली ती आई

त्यांच्यामुळे आज कुणालाच कमी नाही

सुखी समाधानी आहेत सारे त्यांच्या पायी

धावून दिली सरांना कायमची रोजी रोटी

त्या महामानवाला माझा प्रणाम कोटी कोटी  ।। १ ।।


कर्तव्य आपलं चुकू दिलं नाही  कुठं 

ठाई ठाई बांधलं त्यांनी विहार विद्यापीठं 

नष्ट करण्या अंधश्रदेचा अंधार काळाकुटं  

जाता जाता करून दिली बुद्धाची ती भेट  

भ्रांती उडविणाऱ्या भ्रामिकांची  भ्रांती मोठी 

त्या भगवान बुद्धाला माझा प्रणाम कोटी कोटी ।। २।।


स्पृती स्थान शिवरायांची  माता जिजाऊ आई 

स्त्रियांची उधार  करती  फुले सावित्रीबाई 

शाहूमहाराजांची  विध्वता काय काम नाही 

त्यांनी दावून दिली खरी लोकांना लोकशाही   

ज्यांनी या देशाची सुंदर घटना लिहली  मोठी 

त्या घटना काराला माझा प्रणाम कोठी कोठी   ।। ३।। 


भारत मातेला आधी शरण मी जातो 

राष्ट्रीय गीत तिचे प्रेमाने सदा गातो 

महामानवाच्या विचाराचा आदर्श घेतो 

कालेनंदा परी मान मानवंदना त्यांना देतो 

बलिदान केले ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी 

त्या शूरवीरांना माझ्या प्रणाम कोटी कोटी ।। ४ ।।

लेखक कवी गायक भिमराव कालेनंद 

Poets & Writer Bhimrao Kelenand Mumbai 


blue jay bhim flag hd, jay bhim


महामानव आले धर्तीवर 

महामानव आले धर्तीवर  

बाबासाहेब ते आंबेडकरं

किर्ती करून गेले जग भर 

बाबासाहेब  ते आंबेडकरं  ।।धृ ।।

अठराशे एक्यानव साली  माता भिमाई प्रसूत झाली

 रामजी पित्याला लय खुशी आली 14 एप्रिल गौरवशाली

 जन्मले ते युगंधुरंधर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर  ।। १ ।।


जुन्या युगाचे करून निरीक्षण घेतल भिमाने लय शिक्षण

लिहून देशाची संविधान केलं देशाचं रक्षण

युगपुरुष म्हणती नारी नर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर  ।। २ ।।


पहिलं दूर करून अज्ञान अंधश्रद्धा विषमतेची घाण 

टाकली बाजूला काढून त्यानं 

दिली माणुसकी साऱ्या दावून

दिमाखाने लय चातुर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर ।। ३ ।। 


जगातील साऱ्या विद्वानांनी मानले सर्वश्रेष्ठ ज्ञानी

 ना दिसला कुणी बहुगुणी बाबा आंबेडकरांच्या वाणी 

कालेनंदा बुद्धाच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर ।। ४ ।।

लेखक कवी गायक भिमराव कालेनंद 

Poets & Writer Bhimrao Kelenand Mumbai 


jay bhim photo, jay bhim shayari
वाघासारखे भिमाने जगणं शिकवलं 

वाघासारखे भिमाने जगणं शिकवलं 

माणसा संग माणसासारखं वागणं शिकवलं  ।।धृ ।।


ऊच नीच नाही कुणी ना कुणाचा दासं

 हा महामंत्र बाबासाहेबांनी दिला खास

 अंधश्रद्धा विषमतेचा करण्यापूरा नासं 

विकासासाठी केला बुद्धाचा धम्मपास 

महापुरुषाच्या चरणी लागणं शिकवलं 

माणसा संग माणसासारखं वागणं शिकवलं  ।।1 ।।


बरीना हींसा बरी ना चोरी नका खोटं बोलू 

मध्ये पान करून नका ईपरीत चालू

 वैभवाच्या पारड्यात नका ज्ञान मनाला तोलू 

बहुमोलाचे जीवन आपलं नका ते वाया घालू

खर कर्तव्याला जागणं शिकवलं 

माणसा संग माणसासारखं वागणं शिकवलं ।।2 ।।


सदा बाबासाहेब सांगे नारी नरा

एकजूट खंबीरपणे मजबूत धरा

अन्याय दूर करण्याचा एकच मार्ग खरा 

शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा

हक्काचं फळ हक्काने मागणं शिकवलं

माणसा संग माणसासारखं वागणं शिकवलं   ।।3 ।।


मोडेल पण वाकणार नाही खंबीर त्यांचा बाणा 

मोडेल पण वाकणार नाही खंबीर त्यांचा बाणा 

शेवटपर्यंत टिकून गेले रामजीचा राणा 

अभिवादन करून देशातील शूरवीरांना 

धिकारला साऱ्यासमोर रिवाज पुराना 

 अंधश्रद्धा विषमतेला डाग शिकवलं 

आणि माणसा संग माणसासारखं वागणं शिकवलं  ।।4 ।।


प्रत्येकाच्या मनातील उडविण्याला भ्रांती

 प्रत्येकाच्या मनातील उडविण्याला भ्रांती 

जाऊन भिमाने साऱ्या प्रांतोप्रांती 

करून दावली जगाला रक्तहीन क्रांती 

दया क्षमा करुणा देऊन कालेनंदा

 दिली शांती  सम्यक दृष्टीने बघणे शिकवलं 

आणि माणसा संग माणसासारखं वागणं शिकवलं  ।।5 ।।

लेखक कवी गायक भिमराव कालेनंद 

Poets & Writer Bhimrao Kelenand Mumbai 

jay bhim, jay bhim photo

काय तुला दिलग देवानं 

नवस करतेस उपास धरतेस भक्तिभावानं 

काय तुला दिलग देवानं   ।।धृ ।।


भजून भजुन तुझी काया सुकली 

नको त्या पुढे बया तू झुकली

 देवा देवा म्हणतेस खुशाल घुमतेस 

तवा तावा न 

काय तुला दिलं देवानं  ।।1 ।।


 पाहिली का बामणाची आराधीन बाई 

जगात बामनाचा पोतराज नाही 

मग तुझ्या मरीआई कशी अंगात येईल

 सारं पाहिल गावान

 काय तुला दिलं देवानं  ।।2 ।।


आता तरी बाई ध्यानात घ्यावं 

जुनं पुरण सार सोडून द्यावं 

मुलांना शिक्षण करून रक्षण 

 कराव गुणवान 

काय तुला दिलं देवानं   ।।3 ।।


शिक्षणामुळे अंधश्रद्धा जाती 

विवेक बुद्धी समतेची येती

मनोची वृत्ती सैतानी जाती

 ठरती शिलवान 

काय तुला दिलं देवानं  ।।4 ।।


 एकच धम्म आहे नामी 

तोच आला बाई माझ्या कामी

 बुद्ध भगवान काले नंद सांगून गेले 

 काय तुला दिलं देवानं  ।।5 ।।

लेखक कवी गायक भिमराव कालेनंद 

Poets & Writer Bhimrao Kelenand Mumbai 




jay bhim

jay bhim photo

blue jay bhim flag hd

jay bhim shayari

full hd jay bhim photo

dr. babasaheb ambedkar jayanti 2024

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती

बाबासाहेब आंबेडकर जयंती फोटो

आंबेडकर जयंती

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शायरी




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या