बुद्धाची शिकवन । बुद्धाची शिकवण कविता । गौतम बुद्ध विचार । Gautam Buddha Thoughts

मी, लेखक कवी कालेनंद,  खालील  गौतम बुद्धांचे विचार व गौतम बुद्धांची शिकवन मी, माझ्या कवितांच्या  माद्यमातून वाचकांच्या समोर सादर करीत आहे.

बुद्धाची शिकवन 


रसाळ वाणी असावी मुखातं असावं ताब्यात मनं

हिच ती बुद्धाची शिकवनं ।।धृ ।। 



राग लोभ दु:खाचे मूळं / त्यांनीच वैभव दूर दूर पळं

कधीना त्यानं समाधान मिळं / बदनाम होते सार घरकुळं

परस्त्रीमाता परस्त्रीबहीण मानून जगावं जिनं 

हिच ती बुद्धाची शिकवनं ।।१।।


हिंसा चोरी मिथ भाषनं / निंदा ऊठावी माणसातूनं 

बर नाही कोणतच वेसनं / स्वार्थी असे मोठे पणं 

प्रमाणसिल खाणं / शोभेल तस लेनं / निरोगी असावं तनं  

हिच ती बुद्धाची शिकवनं ।।२।।


दया क्षमा करूणा शांती / मिटवी सारी मनाची भ्रांती 

क्षना क्षनाला उत्कर्षाची करती / उदंड रक्त हिनं क्रांती 

शिलवान असावं गुणवान असावं / शुद्ध हवे अचरनं 

हिच ती बुद्धाची शिकवनं ।।३।।


पशु प्राण्यावर दया असावी / नसावं नुसतं युद्ध 

काया शुद्ध वाचा शुद्ध / असावी नीतिमत्ता शुद्ध 

कालेनंदा कामी येत नाही / कधीच परकं धनं 

हिच ती बुद्धाची शिकवनं ।।४।।



मी, माझ्या कवितांच्या द्वारे तुम्हाला तथागत Gautam Buddha Thoughts  व त्यांची शिकवन मांडत आहे. गौतम बुद्ध शिकवन आपण अचरणात आणली तर आपले जीवन हे नक्कीच सुखकर होईल  गौतम बुद्ध यांनी संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दिला त्याच प्रमाणे त्यांचा आयुष्यकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा आहे.


Gautam Buddha Thoughts 

Poets & Writer Bhimrao Kelenand Mumbai  

                    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या