भिक्षा पात्र
नाही जवळ माझ्या काही एक आहे मात्रं
तेच देतो राहुल तुला माझं भिक्षा पात्रं ।। धृ ।।
सोन चांदी हिरा मोती नाही जवळ माझ्या
कशा करू इच्छा पुऱ्या सांग आज तुझ्या
बहू मोलाचं आहे माझं निर्वाणच सूत्र
तेच देतो राहुल तुला माझं भिक्षा पात्रं ।। १ ।।
धनासाठी घालू नको जन्म व्यर्थ वाया
सोडणारं दूर दूर माया मोह गोत्र
तेच देतो राहुल तुला माझं भिक्षा पात्रं ।। २ ।।
भिक्षा पात्रामुळे ज्ञान ते कळेलं
दुःख मय जग सारं पाहायला मिळेल
जाळणार तमगून हंकार एकत्र
तेच देतो राहुल तुला माझं भिक्षा पात्रं ।। ३ ।।
फिरणारा हा गौतम मी गावो गावी
काय करू राहुल सांग तुझ्या नावी
मिळवलेलं कालेनंदा करू दिवस रात्र
तेच देतो राहुल तुला माझं भिक्षा पात्रं ।। ४ ।।
लेखक कवी गायक भिमराव कालेनंद
मी, माझ्या कवितांच्या द्वारे तुम्हाला तथागत Gautam Buddha Thoughts व त्यांची शिकवन मांडत आहे. गौतम बुद्ध शिकवन आपण अचरणात आणली तर आपले जीवन हे नक्कीच सुखकर होईल गौतम बुद्ध यांनी संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दिला त्याच प्रमाणे त्यांचा आयुष्यकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा आहे.
Gautam Buddha Thoughts
Poets & Writer Bhimrao Kelenand Mumbai
0 टिप्पण्या